Robot snake in surgery : कर्करोगावरील शस्त्रक्रियेत रोबो साप उपयुक्त | पुढारी

Robot snake in surgery : कर्करोगावरील शस्त्रक्रियेत रोबो साप उपयुक्त

लंडन : सध्या हरेक प्रकारचे रोबो (Robot snake in surgery) विकसित करण्यात आले आहेत. काही रोबो शस्त्रक्रियाही करू शकतात. आता एक असा रोबो विकसित करण्यात आला आहे ज्यामध्ये सापासारखी लवचिकता आहे. असा रोबो स्नेक येत्या दहा वर्षांच्या काळात कर्करोगावरील शस्त्रक्रियेवेळी उपयुक्त ठरू शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे.

या रिमोट कंट्रोल्ड रोबोला ‘कोब्रा’ (Robot snake in surgery) असेच नाव आहे. त्याचा वापर यापूर्वी जेट इंजिनिअरिंग आणि अणू प्रकल्पांमध्ये करण्यात आला होता. ब्रिटनच्या नॉटिंघम युुनिव्हर्सिटीने हा रोबो स्नेक विकसित केला आहे. अशा प्रकारचा ब्रिटनमधील हा पहिलाच रोबो आहे. याबाबत प्रा. ड्रॅगोस अ‍ॅक्सिंट यांनी सांगितले की हा रोबो शस्त्रक्रिया करू शकतो का हे पाहण्यासाठीच्या सुरुवातीच्या चाचण्या आम्ही सुरू केलेल्या आहेत. सर्जरीसाठी त्याचा वापर व्हावा, याबाबतचे संशोधन करण्यासाठी इंजिनिअरिंग अँड फिजिकल सायन्सेस रिसर्च कौन्सिलकडून निधी देण्यात आला आहे.

विशेषतः घशाच्या कर्करोगाबाबत या रोबोचा कसा वापर होऊ शकतो हे पाहिले जात आहे. साप अतिशय निमुळता असतो आणि तितकाच लवचिकही असतो. त्यामुळे तो कसाही पुढे जाऊ शकतो. हा रोबोही (Robot snake in surgery) अत्यंत सडपातळ आणि लवचिक आहे. तो पाच मीटर म्हणजेच 16 फूट लांबीचा आहे; पण त्याची जाडी अवघी 9 मिलीमीटर व्यासाची (0.35 इंच) आहे. त्यामुळे शरीरांतर्गत अरुंद व नागमोडी जागांमधून सहज पुढे जाऊ शकतो.

हेही वाचा : 

Back to top button