Tommy and Jelly’s wedding : टॉमी आणि जेलीचे थाटात लग्न!

Tommy and Jelly's wedding
Tommy and Jelly's wedding

लखनौ : माणूस हा उत्सवप्रिय माणूस आहे आणि आपल्याकडे तर लग्न समारंभही मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. केवळ माणसाचीच नव्हे तर प्राण्यांचीही थाटात लग्ने लावली जात असतात. आता उत्तर प्रदेशात एका श्वान जोडप्याचाही असाच थाटात विवाह झाला. नवरोबाचं नाव आहे टॉमी आणि नवरीचं नाव आहे जेली. (Tommy and Jelly's wedding) या दोघांच्या लग्नाचा थाटमाट इतका जबरदस्त होता की, बड्या बड्या सेलिब्रिटींपासून ते वृत्तसंस्थांनाही याची दखल घ्यावी लागली. या लग्नासाठी तब्बल 45 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला!

टॉमी हा एक नर (कुत्रा) आहे तर आणि जेली बाई (Tommy and Jelly's wedding) ही एक मादी (कुत्री) आहे. तब्बल 45 हजार रुपये खर्च करून या दोघांचे थाटात लग्न लावून देण्यात आले. उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये नुकतीच टॉमी व जेली यांची रेशीमगाठ जुळवण्यात आली. फक्त लग्नच नव्हे तर वरातीतही मोठा उत्साह दिसून आला. ढोल-ताशांच्या गजरात नवरा-नवरीची थाटात मिरवणूक काढण्यात आली. अत्रौलीच्या टिकरी रायपूर येथील रहिवासी डॉ. रामप्रकाश सिंह यांची सात महिन्यांची जेली आणि सुखरावली गावचे प्रमुख दिनेश चौधरी यांचा कुत्रा टॉमी यांच्या या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. टॉमी आणि जेलीचे लग्न मकर संक्रांतीच्या गोड मुहूर्तावर लागले. लग्नाच्या दिवशी टिकरी रायपूरहून वधू पक्ष सुखरावली गावात पोहोचला.

जेलीच्या कुटुंबातून आलेल्या लोकांनी टॉमी (Tommy and Jelly's wedding) म्हणजेच जावईबापूंचे औक्षण करून स्वागत केले. यानंतर वरातीत वर-वधू पक्ष दोघंही चांगलेच थिरकले. लग्नाची मिरवणूक वधू जेलीच्या घरी पोहोचल्यानंतर मालक आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी त्या दोघांच्या हस्ते हार घालून लग्नावर शिक्कामोर्तब केले. लग्नाची पार्टी म्हणून वर्‍हाडी, शेजारी-पाजारी फिरणारे मित्र कुत्रे या सगळ्यांना देशी तुपाचे लाडू वाटण्यात आले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news