Arthropod Fossils : सात फूट लांबीच्या आर्थोपॉडचे जीवाश्म | पुढारी

Arthropod Fossils : सात फूट लांबीच्या आर्थोपॉडचे जीवाश्म

लंडन : गोलाकार, चपट्या शंखासारखी रचना असलेल्या आर्थोपॉडस्ची अनेक जीवाश्मे (Arthropod Fossils) आतापर्यंत सापडलेली आहेत. काही भलत्याच मोठ्या आकाराच्या आर्थोपॉडस्ची जीवाश्मेही वेळोवेळी सापडत असतात. आताही मोरोक्कोमध्ये सुरुवातीच्या काळातील आर्थोपॉडचे असेच मोठे जीवाश्म सापडले आहे. ते तब्बल 7 फूट लांबीचे आहे. सध्याच्या काळातील कोळंबी, कीटक आणि कोळ्यांशी तुलना करता प्रागैतिहासिक काळातील हे आर्थोपॉड किती भव्य होते याची आपण कल्पना करू शकतो.

485 दशलक्ष ते 470 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या लोवर ऑडोविसियन काळातील जीवाश्मांनी संपन्न असलेल्या तैचुट नावाच्या ठिकाणी हे जीवाश्म सापडले आहे. (Arthropod Fossils) आता हा भाग सध्याच्या मोरोक्कोमधील वाळवंटाचा आहे. लाखो वर्षांपूर्वी तैचुट हे ठिकाण समुद्रात होते. याच ठिकाणी आता या भव्य अशा आर्थोपॉडच्या जीवाश्माचा शोध लावला आहे. त्यामध्ये त्याच्या शरीराचा निम्मा भाग अस्तित्वात आहे. स्वित्झर्लंडमधील लॉसेन युनिव्हर्सिटीतील फरीद सालेह या संशोधकाने सांगितले की याठिकाणी सापडलेले आर्थोपॉडचे भव्य जीवाश्म वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे आर्थोपॉड चांगले पोहणारे होते आणि त्यांनी या भागात 470 दशलक्ष वर्षांपूर्वी अक्षरशः राज्य केले. याठिकाणी अशा आर्थोपॉडस्ची अनेक जीवाश्मे आहेत. ‘एजिरोकॅसिस’ या फिल्टर-फिडिंग आर्थोपॉडच्या लुप्त झालेल्या प्रजातीची अनेक जीवाश्म नमुने याठिकाणी आहेत. त्यांच्या शंखाचा किंवा कवचाचा वरचा भाग अद्याप सुरक्षित राहिलेला आहे. काही जीवाश्मांमध्ये अंतर्गत अवयवांचा मऊ भागही सुरक्षित राहिलेला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

Back to top button