Jetpack : आकाशी झेप घे रे….मानवा! | पुढारी

Jetpack : आकाशी झेप घे रे....मानवा!

न्यूयॉर्क : पक्ष्यांसारखे आपल्याला उडता यावे अशी माणसाची इच्छा जुन्या काळापासूनच आहे. त्यामधूनच विमान, हेलिकॉप्टर, हॉट एअर बलून, पॅराग्लायडिंग वगैरेंचा जन्म झाला. मात्र, तरीही एकटेच आकाशात झेप घेण्याची ओढ काही शांत झाली नव्हती. ही इच्छा जेटपॅकच्या (Jetpack) सहाय्याने पूर्ण झाली.

आता एका तरुणाने अशाच जेटपॅकच्या (Jetpack) मदतीने आकाशात झेप घेतली. खांद्यावर एक डिव्हाईस लावून ते ऑन केल्यानंतर बॅकपॅकसारखे वाटणारे हे जेटपॅक माणसाला हवेत उडायला मदत करते. या माणसाचा हवेतील संपूर्ण थरार कॅमेरा कैद झाल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका यूजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. “भविष्य इथे आहे,” असे कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आले आहे. एका माणसाने त्याच्या खांद्यावर जेटपॅक (Jetpack) बांधल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हे जेटपॅक ऑन केल्यानंतर रॉकेटसारखीच आग त्यातून बाहेर पडताना दिसते. काही सेकंदानंतर तो व्यक्ती दोन्ही हात सोडून हवेत उडू लागतो. त्या व्यक्तीला हवेत उडताना पाहून आजूबाजूला असणार्‍या लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. विशेष म्हणजे हवेत झेप घेतल्यानंतर तो व्यक्ती स्वत:ला एका जागी स्थिर ठेवण्याचाही प्रयत्न करताना व्हिडीओत दिसत आहे. तो एक गोल चक्कर मारून येतो.

वेगवेगळया ठिकाणी कॅमेरे सरसावून उभ्या असलेल्या लोकांसमोर उडत जातो व त्यांना पोज देतो. जमिनीवर ठेवलेल्या गोलाकार बाकांवर हवेतून उड्या मारत उभे राहतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Jetpack) झाल्याने लाखोंच्या संख्येत या व्हिडीओला व्ह्यूज मिळाले आहेत. हा भन्नाट व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकर्‍यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. प्रसिद्ध मार्वेल सुपरहीरो आयर्न मॅनच्याकडून या जेटपॅकबद्दल प्रेरणा मिळाली असेल, असेही एका नेटकर्‍याने म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button