सैनिकांसाठी थ्रीडी प्रिंटिंगने बनवले सुरक्षा कवच

सैनिकांसाठी थ्रीडी प्रिंटिंगने बनवले सुरक्षा कवच
Published on
Updated on

नवी दिल्ली : सध्याचा जमाना थ्रीडी प्रिंटिंगचा आहे आणि भारतीय संरक्षण क्षेत्रातही त्याचा वापर सुरू आहे. भारतीय लष्कराच्या इंजिनिअर्सनी पहिल्यांदाच थ्रीडी प्रिंटेट स्थायी सुरक्षेची निर्मिती केली आहे. या सैन्य चौकीवर किंवा सुरक्षा ठिकाणांवर छोट्या शस्त्रांपासून ते टी 90 टँकच्या मुख्य बंदुकीपर्यंतच्या शस्त्रास्त्रांचा प्रयोग करून पाहण्यात आला आहे. हे सुरक्षा कवच अभेद्य असल्याचे आढळून आले. भारतीय लष्कराचे इंजिनिअर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

ते म्हणाले की, ही यंत्रणा स्फोट सहन करण्यास सक्षम आहेत आणि 36 ते 48 तासांत पुन्हा उभी केली जाऊ शकतात. तसेच एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरितदेखील केली जाऊ शकते. यासोबतच त्यांनी सांगितले की, पूर्व लडाखमध्ये अशाच कायमस्वरूपी संरक्षणाची चाचणी घेण्यात आली आहे आणि ती उपयुक्त ठरली आहे. लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी सांगितले की, भारतीय लष्कर स्वदेशी आधुनिकीकरणासाठी सज्ज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news