शरीरातून वीज खेळवणारा अफलातून माणूस!

शरीरातून वीज खेळवणारा अफलातून माणूस!
Published on
Updated on

नवी दिल्ली : जगात काही माणसं अशी आहेत ज्यांच्यावर विजेचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. यापैकी काही माणसं आपल्या देशातच आहेत. त्यापैकी एक माणूस तर हातात उघडी तार धरून 220 व्होल्टच्या करंटने आरामात चिकनला फ्राय करतो. तारेला जिभेचा स्पर्श करतो आणि बल्ब प्रकाशित होतो. शरीरात वीज खेळवून हा माणूस ड्रिल मशिनही चालवतो. प्रथमदर्शनी सामान्य माणूस वाटणार्‍या या माणसाच्या या करामती थक्क करणार्‍याच आहेत. केरळच्या कोल्लममध्ये राहणार्‍या या माणसाचे नाव आहे राजमोहन नायर.

विजेच्या तारांना पकडून ते शरीराला टेस्टरच्या साहाय्याने चेक करतात. टेस्टरची लाईटही प्रज्वलित होते. ते विजेचा मोठा धक्काही सहज सहन करू शकतात. आपल्यामधील या क्षमतेची जाणीव त्यांना लहानपणीच एका दुःखद प्रसंगी झाली होती. ज्यावेळी ते तिसरीत शिकत होते त्यावेळी वडिलांच्या पाठोपाठ त्यांच्या आईचेही निधन झाले.

पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्या जीवनात नैराश्याचा काळोख पसरला होता. शिक्षकांनीही त्यांना तू पुढे शिक्षण घेऊ शकणार नाहीस, असे सांगितले होते. अशावेळी त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला. त्यांनी ट्रान्स्फॉर्मरच्या उघड्या तारांना पकडले; पण त्यांच्यावर विजेचा कोणताच परिणाम झाला नाही. त्यांच्या जागी दुसरा कुणी असता तर जागीच मृत्युमुखी पडला असता.

आपल्यामध्ये ही विशेष क्षमता असल्याचे जाणवल्यावर त्यांना जगण्याची उमेद वाटू लागली. त्यांचे कुतूहल वाढले आणि ते वेगवेगळे प्रयोग करून पाहू लागले. त्यानंतर त्यांनी आपल्या या क्षमतेचे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी ते स्टेज शो करू लागले व लोक त्यांना 'इलेक्ट्रिक मॅन' म्हणून ओळखू लागले. अनाथ असल्याने अनेकांनी त्यांना मदतही केली. ते विजेचे जे खतरनाक खेळ करून दाखवतात त्याची नक्कल कुणीही करू नये, तसे करणे जीवावर बेतू शकते, असे ते आवर्जून सांगतात!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news