Alien : ‘या’ ठिकाणी एलियनचा मृतदेह?

Alien
Alien
Published on
Updated on

वॉशिंग्टन : जगात अशी अनेक रहस्यमयी ठिकाणे आहेत, ज्याबद्दल अनेक प्रकारच्या कथा व्हायरल आहेत. मात्र, त्यांच्याबाबत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. असेच एक रहस्यमय ठिकाण अमेरिकेत लास वेगासपासून काही अंतरावर आहे. ते 'एरिया 51' म्हणून प्रसिद्ध आहे. हे एक रहस्यमय ठिकाण आहे. रॉसवेल्झ यूएफओ क्रॅशमध्ये मारल्या गेलेल्या एलियनचा (Alien) मृतदेह या ठिकाणी ठेवण्यात आला असल्याचे म्हटले जाते. 1989 मध्ये रॉबर्ट लेजर नावाच्या व्यक्तीने 'एलियन 51' मध्ये एलियन तंत्रज्ञानावर काम करत असल्याचा दावा केला होता. मृत एलियनचे फोटोही पाहिल्याचा दावाही त्यांनी केला.

परंतु, याबाबत कोणत्याही प्रकारचा फोटो समोर आलेला नाही. गुगल मॅपवर या ठिकाणाचे काही फोटो आहेत. असे म्हटले जाते की, 'एरिया 51' हे असे ठिकाण आहे, जिथे अनेक हेरगिरीची कामे केली जातात. शस्त्रे, विमाने अशा यांची चाचणी घेतली जाते. यासोबतच हे ठिकाण एलियन्सच्या (Alien) कथाही प्रसिद्ध आहेत.

'एरिया 51' नेवाडाच्या दक्षिण भागात लास वेगासच्या वायव्येस 83 मैल आहे. ही जागा नेहमीच गुप्त (Alien) ठेवण्यात आली होती. असे म्हटले जाते की, हा एक एअरबेस आहे, जो सामान्यतः विमाने आणि शस्त्रासस्त्रांच्या चाचणीसाठी वापरला जातो. त्याला 'स्पाय वेपन्स लॅब' असेही म्हणतात. अमेरिकन हवाई दलाने ते 1955 मध्ये विकत घेतले. 'सीआयए'ने नेहमीच अशी कोणती साईट असल्याचे नाकारले आहे.

कॉन्सपिरेसी थिअरीटा असा विश्वास आहे की, या तळाचा वापर क्रॅश झालेल्या एलियन (Alien) विमानाची साठवण, चाचणी आणि दुरुस्ती करण्यासाठी केला जातो. 1950 मध्ये झालेल्या रोझवेल दुर्घटनेचे साहित्यही ठेवण्यात आले आहे. रोसवेल ही घटना न्यू मेक्सिकोच्या रोसवेल जवळील एका शेतात घडली. हा यूएस एअरफोर्सचा मोठ्या फुग्याप्रमाणे गोलाकार तुकडा असल्याचे सांगण्यात येत होते; पण नंतर तो फ्लाइंग सॉसर असल्याचा दावा केला आणि अमेरिकेने याबाबतचे सत्य दडवण्याचाच प्रयत्न केल्याचे म्हटले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news