smoking : धूम्रपानामुळे तब्बल ५६ आजारांचा धोका | पुढारी

smoking : धूम्रपानामुळे तब्बल ५६ आजारांचा धोका

बीजिंग : जगभरातील धूम्रपान (smoking) करणारे ४० टक्के लोक एकट्या चीनमध्येच राहतात. अलीकडेच लान्सेट या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार या लोकांना धूम्रपान न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत ५६ आजारांचा धोका अधिक आहे. त्यामध्ये अनेक प्रकारच्या कर्करोगांपासून ते हृदय, मेंदू, यकृत आणि डोळ्यांच्या आजारापर्यंतच्या विविध आजारांचा समावेश होतो.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अनेक चिनी रिसर्च इन्स्टिट्यूटने मिळून याबाबतचे संशोधन केले आहे. त्यासाठी चायना कडूरी बायोबॅकच्या डेटाचा वापर करण्यात आला. या अभ्यासात ५ लाख १२ हजारांपेक्षाही अधिक लोकांच्या आरोग्यावर सुमारे अकरा वर्षे नजर ठेवण्यात आली. त्यामध्ये सुमारे ३ लाख महिला होत्या, मात्र नियमितपणे धूम्रपान (smoking) करणारे ७४.३ टक्के पुरुष होते. संशोधक लिमिंग ली यांनी सांगितले की चीनमधील दोन तृतियांश पुरुष वयाच्या विसाव्या वर्षाच्या आधीपासूनच सिगारेटच्या व्यसनात अडकतात.

धूम्रपान (smoking) न सोडल्यामुळे यापैकी निम्म्या लोकांना आपल्या व्यसनामुळे प्राण गमवावा लागतो. चीनमध्ये धूम्रपानाने दर वर्षी सुमारे दहा लाख लोकांचा मृत्यू होतो. याचा अर्थ रोज सरासरी तीन हजार लोक या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात. वैज्ञानिकांना आढळले की ज्या लोकांनी कधीही धूम्रपान केलेले नाही अशा लोकांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांना गंभीर आजार होण्याचा धोका दहा टक्के अधिक असतो. सर्वात अधिक धोका ‘लेक्सि कॅन्सरचा आहे. हा धोका २१६ टक्के असतो. ‘लॅक्स’ म्हणजे ‘व्हॉईस बॉक्स’ किंवा ‘कंट’. नियमितपणे धूम्रपान करणान्यांना ५६ आजारांचा धोका संभवतो, त्यापैकी ५० रोग पुरुषांना आणि २४ रोग महिलांना आपली शिकार बनवू शकतात. तसेच २२ आजार मृत्यूचे कारणही बनू शकतात. या आजारांमध्ये दहा हृदयरोग, १३ श्वासासंबंधीचे रोग. १४ कर्करोग, पाच पोटाशी संबंधित रोग आणि १३ रोगांमध्ये मधुमेह, मोतिबिंदूसारख्या अन्य समस्यांचा समावेश होतो.

हेही वाचा : 

Back to top button