

लंडन : 18 व्या शतकात थॉमस बस्बी नावाचा माणूस इंग्लंडमधील थर्स्क येथे रहात होता. त्याचा डॅनियल ऑटी नावाचा मित्र होता. हे दोघेही बनावट नाणी बनवण्याचे बेकायदेशीर काम करायचे. रोज काम संपल्यावर दोघे थिरस्क येथील त्यांच्या आवडत्या बारमध्ये एकत्र बसायचे आणि तिथे भरपूर मद्यपान करायचे. थॉमस नेहमी त्या बारमध्ये एकाच (Death Chair) खुर्चीवर बसायचा, त्यामुळे त्याला एक विशेष आसक्ती होती. बारमध्ये आल्यानंतर त्या खुर्चीत कोणी बसले असेल तर थॉमस त्याच्याशी भांडून खुर्ची रिकामी करायला लावायचा. दुसर्यांना बळजबरीने तेथून हटवून तो स्वतः त्यात बसायचा. मात्र ही खुर्ची पुढे जाऊन अनेकांचे प्राण घेणार होती. याची कोणालाच कल्पना नव्हती.
कथा 1702 मध्ये सुरू होते.
एके दिवशी एका बारमध्ये थॉमस आणि डॅनियल यांच्यात कशावरून तरी भांडण झाले. थॉमसला इतका राग आला की त्याने डॅनियलचा खून केला. नंतर थॉमसला हत्येच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ज्या दिवशी थॉमसला फाशी दिली जाणार होती त्यावेळी शेवटची इच्छा व्यक्त करताना थॉमसने सांगितले की, थिरस्क येथील बारमध्ये त्याच्या आवडत्या (Death Chair) खुर्चीवर बसून त्याला शेवटचे जेवण करायचे आहे. थॉमसची ही इच्छा मान्य करण्यात आली आणि त्याला त्याच बारमध्ये नेण्यात आले.
जेवण संपवून तो उभा राहिला आणि बोलू लागला, 'जो कोणी माझ्या खुर्चीवर (Death Chair) बसण्याची हिंमत करेल तो मरेल'. तेव्हापासून ही खुर्ची खरोखरच शापित झाली. दुसर्या महायुद्धादरम्यान शाही नौदलाचे दोन पायलट त्या पबमध्ये आले आणि त्या खुर्चीवर बसले. त्यानंतर ते दोघे पबमधून बाहेर येताच त्यांच्या कारला अपघात झाला आणि दोन्ही पायलटचा मृत्यू झाला. यानंतर या खुर्चीवर जो कोणी बसला त्याचा गूढ मृत्यू झाला. यामुळे पब मालकाने ही खुर्ची पबच्या गोडाऊनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. तिथेही या खुर्चीचा शाप कायम होता.
एकदा गोदामात सामान ठेवायला आलेला कामगार थकला आणि त्या (Death Chair) खुर्चीवर बसला. त्यानंतर तासाभराने त्या कामगाराचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर पबच्या मालकाने ही खुर्ची थर्स्कच्या संग्रहालयाला दान केली. तेव्हापासून ही खुर्ची त्या संग्रहालयात 5 फूट उंचीवर ठेवण्यात आली, जेणेकरून चुकूनही या खुर्चीवर कोणी बसू नये.