अजबच…, सूर्यामध्ये फिरतेय विशालकाय सर्पाकृती!

अजबच…, सूर्यामध्ये फिरतेय विशालकाय सर्पाकृती!

वॉशिंग्टन : सूर्यामध्ये एक विशालकाय साप फिरत असल्याचा दावा केला जात असून सापासंबंधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतोय. विशेष म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी सोलर ऑर्बिटरने हा व्हिडीओ तयार केला आहे. यात सूर्याच्या पृष्ठभागावर एका सापाच्या आकारासारखी हालचाल स्पष्टपणे हालचाल दिसत असून हा व्हिडीओ 5 सप्टेंबर 2022 चा असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी सोलर ऑर्बिटर सूर्याच्या अगदी जवळ होते. सूर्याच्या पृष्ठभागावर दिसणारे हे चित्र आहे तरी काय? सापासारखी दिसणारी ती आकृती म्हणजे नेमके काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

संशोधकांनाही समजणे कठीण असणार्‍या अनेक गोष्टी सूर्यमालेत घडत असतात. अशा सौर लहरींसाठी सूर्याचे चुंबकीय क्षेत्रही कारणीभूत असल्याचे मानले जाते. लहरींच्या निर्मितीदरम्यान तापमानात चढ-उतार होत असतात आणि या चढउतारांमुळे अशा लहरी निर्माण होतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. याआधीही सूर्यावर अशाच प्रकारच्या हालचाली दिसल्या होत्या. मूळात सूर्याचे तापमान प्रचंड असल्यामुळे इतर ग्रहांप्रमाणे सूर्यावर यान पाठवून किंवा सॅटेलाईटच्या माध्यमातून सूर्यावरील स्थिती जाणून घेणे कोणत्याही स्थितीत शक्य नाही. तथापि, सूर्यावर वारंवार सौरवादळे येत असतात आणि त्यातूनच हे चित्र निर्माण झाले असे खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news