लहानपणी झाले होते अपहरण; 51 वर्षांनी भेटली कुटुंबाला! | पुढारी

लहानपणी झाले होते अपहरण; 51 वर्षांनी भेटली कुटुंबाला!

न्यूयॉर्क : अमेरिकेत एका महिलेला ती लहान असतानाच अपहरण करण्यात आले होते. आता तब्बल 51 वर्षांनी ती आपल्या कुटुंबाला भेटली आहे. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल अशा प्रकारची तिची जीवनकहाणी आहे.

ही घटना अमेरिकेतील टेक्सासमधील आहे. या महिलेचे नाव आहे मेलिसा हायस्मिथ. ज्यावेळी ती लहान होती त्यावेळी म्हणजे 23 ऑगस्ट 1971 मध्ये तिचे अपहरण झाले होते. टेक्सासच्या फोर्ट वर्थमधून तिच्या दाईनेच तिचे अपहरण केले होते. त्यावेळी तिला शोधण्याचे बरेच प्रयत्न करण्यात आले; पण तिचा शोध लागू शकला नाही. तिची आई अल्टा अपेंटेंको हिने अनेक वर्तमानपत्रांमध्येही तिचे फोटो प्रसिद्ध केले होते. मात्र, हे सर्व प्रयत्न व्यर्थच गेले.

अखेर सध्याच्या उच्च तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या जमान्यात मेलिसाला आपल्या कुटुंबाचा शोध लागलाच. अलीकडेच तिची आपले आई-वडील आणि चार भावंडांशी भेट झाली. त्यांची डीएनए टेस्टही झाली ज्यावरून मेलिसा ही त्यांच्याच कुटुंबातील असल्याचे सिद्ध झाले. आता मेलिसा आपल्या आईसमवेत राहू लागली आहे.

हे ही वाचा :

अमरावती : एका पायाने केला तब्बल २ लाख किलोमीटरचा सायकल प्रवास

Elon Musk : एलन मस्क यांच्या टेबलवर असतात ‘या’ वस्तू!

Back to top button