asteroid : पृथ्वीच्या दिशेने येत आहे नवा लघुग्रह | पुढारी

asteroid : पृथ्वीच्या दिशेने येत आहे नवा लघुग्रह

वॉशिंग्टन : (asteroid) पृथ्वीजवळून सातत्याने लघुग्रह जात असतात व आताही एक नवा लघुग्रह पृथ्वीच्या ‘भेटी’ला येत आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने याबाबतची माहिती दिली आहे. या लघुग्रहाचा आकार अतिशय मोठा असल्याने तो पृथ्वीवर आदळला तर कहर होऊ शकतो. मात्र तसे काही घडणार नाही!

खगोल शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीच्या दिशेने वेगाने येणार्‍या या लघुग्रहाचा (asteroid) आकार सुमारे 65 फूट आहे आणि तो पृथ्वीपासून 4 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून ताशी 15,408 कि.मी. वेगाने जाईल. वॉशिंग्टनमधील ‘नासा’च्या मुख्यालयात प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिस स्थापन करण्यात आले आहे आणि ते प्लॅनेटरी सायन्स डिव्हिजनद्वारे व्यवस्थापित केले जात आहे. ‘पीडीसीओ’ संभाव्य धोकादायक वस्तू किंवा खगोल वेळेवर शोधण्यासाठी जबाबदार आहे. यामध्ये लघुग्रह आणि धूमकेतू यांचा समावेश होतो.

पृथ्वीवरील संभाव्य धोक्यांचा मागोवा ठेवण्यासाठी, ‘नासा’ने ’प्लॅनेटरी डिफेन्स’ तयार करण्यासाठी अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञांची एक टीम एकत्र केली आहे. सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज, जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी आणि स्मॉल-बॉडी डेटाबेस हे सर्व या पथकात आहेत. शास्त्रज्ञांनी या नवीन लघुग्रहाला (asteroid) ‘2022 यूडी 72’ असे नाव दिले आहे.

Back to top button