आता थेट चंद्रावरच ‘इक बंगला बने न्यारा…’ | पुढारी

आता थेट चंद्रावरच ‘इक बंगला बने न्यारा...’

लंडन : चंद्राचे सौंदर्य आणि त्यावरील तो काळा डाग याबद्दल आपण आतापर्यंत अनेकदा ऐकले, वाचले आहे. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले त्यालाही दीर्घ काळ लोटला आहे. आता मात्र थेट चंद्रावर वास्तव्य करण्याचे मानवाचे स्वप्न या दशकात पूर्ण होऊ शकते. ‘स्पेस एक्स’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क हेच नाही तर आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’देखील या संकल्पनेबद्दल सकारात्मक आहे.

चंद्रावर जमीन खरेदीची चर्चा आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. जमीन खरेदी केल्यानंतर काहीजण त्याबाबतचे प्रमाणही सोशल मीडियावर शेअर करीत असतात. वास्तवात चंद्रावर जमीन खरेदीची चेष्टाच जास्त होत असते. पृथ्वीच्या कक्षेबाहेर असलेल्या या उपग्रहावर ज्यांनी खरोखर जमीन विकत घेतली आहे, त्यांनाही तेथे जाऊन राहता येणार काय, ही परीकल्पना सत्यात उतरणार असल्याचा दिलासा मिळू लागला आहे.

‘नासा’च्या ओरायन चांद्रयान कार्यक्रमाचे प्रमुख हॉवर्ड हू यांनी ‘बीबीसी’शी बोलता मानव दीर्घकाळ चंद्रावर राहू शकेल, असा सकारात्मक विचार मांडला आहे. ते म्हणाले, अंतराळातील अतिखोल वातावरणात कसे राहता येईल, याची चाचपणी करण्यासाठी अर्टिमिस मोहीम आमच्यासाठी एक शाश्वत व्यासपीठ आणि प्रवासाची निश्चित दिशा देणारी आहे. आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर मानवाला पाठविणार असून ते तिथे राहून विज्ञानाचे प्रयोग करतील.

Back to top button