गुलाबी हिर्‍याला मिळू शकते 284 कोटींची किंमत | पुढारी

गुलाबी हिर्‍याला मिळू शकते 284 कोटींची किंमत

न्यूयॉर्क : जगात अनेक सुंदर हिरे आहेत; पण निळ्या, पिवळ्या व गुलाबी अशा रंगांच्या हिर्‍यांचे एक वेगळेच वैशिष्ट असते. जगात एक टपोरा काळ्या रंगाचाही हिरा आहे हे विशेष. गुलाबी रंगाचे हिरे दागिन्यांमध्ये अधिक शोभून दिसत असतात. असे हिरे दुर्मीळही असतात व त्यामुळे त्यांना लिलावात मोठी किंमत मिळत असते. आता अशाच एका टपोर्‍या, गुलाबी रंगाच्या हिर्‍याचा लिलाव होणार आहे. त्याला या लिलावात 284 कोटी रुपयांची किंमत मिळेल असा अंदाज आहे.

हा सुंदर हिरा 13.15 कॅरेटचा आहे. या दुर्मीळ गुलाबी हिर्‍याचा डिसेंबरमध्ये लिलाव होणार आहे. ज्यासाठी 3.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमार 284 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली जाऊ शकते. 10 टक्क्यांहून कमी गुलाबी हिरे इतके मोठे आहेत. हा हिरा न्यूयॉर्कमध्ये 2 ते 5 डिसेंबर आणि हाँगकाँगमध्ये 25 ते 28 नोव्हेंबर रोजी पाहता येणार आहे. त्याचा लिलाव 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

Back to top button