मुलांसाठी ‘ओमेगा-3’चे अनेक लाभ | पुढारी

मुलांसाठी ‘ओमेगा-3’चे अनेक लाभ

नवी दिल्ली : ‘ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड’ हे लहान मुलांची वाढ आणि विकास यासाठी अतिशय गरजेचे असते. मत्स्याहारातून हे फॅटी अ‍ॅसिड शरीराला मिळू शकते. फिश ऑईलमध्येही ते चांगल्या प्रमाणात असते. मुलांच्या मेंदूचा चांगला विकास व्हावा यासाठी ऑयली फिशचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात असतो. काही वेळा फिश ऑईल सप्लिमेंटस्चे सेवन करण्याचाही सल्ला दिला जातो.

‘ओमेगा-3’ हे पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड गटाचा एक घटक आहे. ते मानवी आरोग्यासाठी अतिशय गरजेचे आहे. साल्मन, सार्डिन, टुना व सागरी छोटे मासे यांच्यामध्ये हे फॅटी अ‍ॅसिड चांगल्या प्रमाणात असते. याशिवाय अंडी, अक्रोड, दही व दुधातूनही ते मिळते. जर मुलांनी आठवड्यातून एकदा ऑयली फिशचे सेवन केले तर त्यांना फिश ऑईल सप्लिमेंटस् घेण्याची गरज राहत नाही. विविध आजारांपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठीही ‘ओमेगा-3’ हे फॅटी अ‍ॅसिड उपयुक्त असते. मानसिक आजार दूर ठेवण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढणे, मेंदूचे कार्य चांगले ठेवणे यासाठीही हे फॅटी अ‍ॅसिड गुणकारी आहे.

संबंधित बातम्या
Back to top button