अंतराळातील जैविक उपयोगासाठी बनवले मॉड्युलर उपकरण | पुढारी

अंतराळातील जैविक उपयोगासाठी बनवले मॉड्युलर उपकरण

नवी दिल्ली : भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) मधील संशोधकांनी अंतराळात सूक्ष्म जीवांच्या संवर्धनासाठी एक मॉड्युलर उपकरण विकसित केले आहे. हे नवे मॉड्युलर उपकरण बाह्य अंतरीक्षात जैविक प्रयोगांसाठी उपयोगी ठरू शकते.

कमीत कमी मानवीय हस्तक्षेपाशिवाय या मॉड्युलर उपकरणाचा वापर कशा पद्धतीने स्पोरोसारसीना पेस्टुरी नावाच्या जीवाणूचा विकास करण्यासाठी होऊ शकतो हे संशोधकांनी दाखवले आहे.

हे उपकरण अनेक दिवस अशा जीवाणूंना ‘ट्रॅक’ही करू शकते. ‘एक्टा एस्ट्रोनॉटिका’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारत 2022 मध्ये ‘गगनयान’ मोहीम सुरू करणार आहे.

त्यावेळी पहिल्यांदाच भारतीय संशोधक स्वदेश निर्मित अंतराळ यानातून अंतराळप्रवास करतील. या मोहिमेत हे उपकरण उपयुक्त ठरू शकेल. यामध्ये जीवाणूचा विकास ‘ट्रॅक’ करण्यासाठी एलईडी आणि फोटोडायोड सेन्सरचा वापर करण्यात आला आहे.

Back to top button