Navi Mumbai : मुरूडच्या गिधाड रेस्टॉरंटमध्ये आढळले 'दुर्मिळ इजिप्शियन गिधाड'

पुढारी ऑनलाइन डेस्क : मुरुड येथील फणसाड वन्यजीव अभयारण्यात एक दुर्मिळ इजिप्शियन गिधाड पाहण्यात आले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी सायंकाळच्या सुमारास हे गिधाड दिसल्याची माहिती वन अधिका-यांनी दिली.
गिधाडांचे संवर्धन करण्यासाठी ग्रीन वर्क्स ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था आणि वनविभाग एकत्रित काम करत आहेत. वनविभागाने संस्थेच्या मदतीने गिधाडांसाठी व्हल्चर रेस्टॉरंट तयार केले आहे. हे रेस्टॉरंट एक ओपन-एअर साइट आहे जिथे पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांना आकर्षित करण्साठी अन्न ठेवले जाते. वन अधिका-यांनी गेल्या वर्षी गिधाड संवर्धनासाठी हे रेस्टॉरंट तयार केले अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक नंदकिशोर कुपटे यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी एका गावातून एका म्हशीचा मृतदेह आणून गिधाड उपहारगृहात ठेवण्यात आला होता. कदाचित यामुळे हा दुर्मिळ पक्षी इथे आढळला असेल, असे अधिका-यांनी सांगितले.
”आमच्या प्रयत्नांना फळ मिळत आहे हे खूप आनंदादयी आहे,” असे ग्रीन वर्क्स ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या एका स्वयंसेवकाने सांगितले आहे.
हे ही वाचा :