

न्यूयॉर्क : मानवी शरीरातील प्रत्येक अवयवाला महत्त्व आहे. प्रत्येक अवयवाचे काम वेगळे असते, त्यामुळे मानवी शरीर संतुलित राखले जाते. नखांमुळे माणसाच्या हाताला आणि पायाला संरक्षणाचे एक कवच आहे. मात्र, हाताचे अथवा पायाचे बोट नसलेली व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर नखे नसलेल्या बोटांचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीला अनोनिशिया कोजेनिटा नावाचा दुर्मीळ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
युनायडेट स्टेटस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसनच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या माहितीनुसार, एनोनिशिया हा एक दुर्मीळ आजार आहे. गुणसूत्रांमध्ये झालेले बदल अथवा एखाद्या सिंड्रोममुळे हा आजार एखाद्याला होऊ शकतो. अनोनिशिया या दुर्मीळ आजारावर सध्या तरी वैद्यकीय क्षेत्रात उपचार पद्धती अद्याप झालेली नाही, मात्र कृत्रिम नखांचे प्रत्यारोपण करता येते, असे संशोधकांनी नमूद केले.