1.9 अब्ज वर्षांपूर्वीच्या अवकाशीय स्फोटाचे आता झाले दर्शन! | पुढारी

1.9 अब्ज वर्षांपूर्वीच्या अवकाशीय स्फोटाचे आता झाले दर्शन!

वॉशिंग्टन ः अंतराळात व जमिनीवर असलेल्या अनेक दुर्बिणींमधून 9 ऑक्टोबरला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या स्फोटांपैकी एक पाहण्यात आला. हा स्फोट दुर्बिणींमधून रेकॉर्ड झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली स्फोटांपैकी एक असू शकतो. ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार गामा किरणांचा स्फोट किंवा ‘जीआरबी’ ब—ह्मांडातील स्फोटांपैकी एक सर्वात शक्तिशाली भाग आहे. जगभरातील अनेक टेलिस्कोप या स्फोटानंतरचे परिणाम पाहत आहेत. हा स्फोट पृथ्वीवरून आता दिसला असला तरी वास्तवात तो 1.9 अब्ज वर्षांपूर्वी झालेला आहे.

मेरीलँड विद्यापीठ आणि वॉशिंग्टन डीसीमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉक्टरेटचे विद्यार्थी ब—ेंडन ओकॉनर यांनी सांगितले की असामान्यपणे दीर्घ ‘जीआरबी 221009 ए’ची नोंद आतापर्यंतच्या सर्वात चमकदार गामा किरणांच्या स्फोटांपैकी एक झाली आहे. या स्फोटाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. हा स्फोट इतका चमकदार आहे की कृष्णविवराच्या निर्मितीपासून डार्क मॅटर मॉडेलच्या परीक्षणापर्यंत या स्फोटांबाबत काही सर्वात मूलभूत प्रश्नांना जाणून घेण्याची ही शतकांमधून येणारी सर्वात महत्त्वाची संधी आहे. वैज्ञानिकांना असे वाटते की या ‘जीआरबी’ची निर्मिती अशावेळी झाली ज्यावेळी 2.4 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावरील सगीत्ता तारामंडलातील एक मोठा तारा मृत्युमुखी पडून त्याचे रूपांतर कृष्णविवरात झाले.

ज्या तार्‍याचा मृत्यू झाला तो आपल्या सूर्याच्या तुलनेत अनेक पटीने मोठा असावा असे संशोधकांना वाटते. गामा किरणे आणि एक्स-रे आपल्या सौरमंडळातून जात असतात. ‘नासा’च्या फर्मी गामा-रे स्पेस टेलिस्कोपसह अनेक ऑब्झर्व्हेटरीमधून ते पाहण्यात आले. या स्फोटातून निघालेले कण प्रकाशाच्या गतीने जाऊ शकतात. या कणांपासून एक्स-रे आणि गामा किरणे बाहेर पडतात. हा स्फोट जरी 9 ऑक्टोबरला पृथ्वीवरून पाहायला मिळाला तरी तो वास्तवात 1.9 अब्ज वर्षांपूर्वी झालेला आहे. स्फोट झालेले स्थळ पृथ्वीपासून इतके दूर आहे की त्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी अब्जावधी वर्षे निघून गेली. फर्मी टेलिस्कोपने सुमारे दहा तास या स्फोटाची नोंद घेतली.

संबंधित बातम्या
Back to top button