वटवाघळांची घटती संख्या चिंताजनक | पुढारी

वटवाघळांची घटती संख्या चिंताजनक

वॉशिंग्टन : जगभरातून वटवाघळांची संख्या सातत्याने घटत असल्याचे समोर आले आहे. वर्षात वटवाघळांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याची शक्यता आहे. पर्यावरण रक्षण आणि फुलांना परागण पुरवण्यास वटवाघळाची खूप मदत होते.वाटवाघूळ कीटकांना खाते, त्यामुळे शेतीचे नुकसान कमी होण्यास मदत होते. जैविक परिस्थिती चांगली राखण्यात वटवाघळाचे महत्त्वपूर्ण योगदान असते. मात्र, आता वटवाघळांची घटती संख्या चिंतेचा विषय आहे. उत्तर अमेरिकेत तर वटवाघळांची संख्या तर खूपच कमी होत चालली आहे.

वृक्षतोड, शहरीकरण, शेती क्षेत्राचे वाढते प्रमाण यामुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पिकांवर कीटनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी केली जात असल्याने वटवाघळांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. फंगस (कवक) आणि स्यडोगागाईमनोस्कसमुळे व्हाईट नोझ सिंड्रोम पसरतो. यामुळे उत्तर अमेरिकेतील 60 लाख वटवाघळांचा मृत्यू झाला असून पूर्व कॅनडामध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक वटवाघळांची संख्या कमी झाली आहे. जगभरातील एकूण संख्येपैकी एक चतुर्थांश वटवाघळांचा जीव पाळीव मांजरांनी घेतला असल्याचे संशोधक कायली बायर्स यांनी सांगितले. या मांजरांमुळे केवळ वटवाघळेच नाही तर त्यांच्यामुळे जैवविविधता धोक्यात आली असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

Back to top button