तरीही ‘ते’ जिवंत राहिले | पुढारी

तरीही ‘ते’ जिवंत राहिले

टोकिओ : सध्या जगाने सर्वच क्षेत्रांत वेगाने प्रगती केली असली तरी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या माणसाला समजण्यापलीकडच्या आहेत. आता आपण अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत की जी संशोधक आणि डॉक्टरांच्याही समजण्यापलीकडची आहे. ही गोष्ट आहे जपानमधील सरकारी नोकर मित्सुटाका उचीकोशी यांची.त्यांच्याबरोबर अशी घटना घडली होती की विज्ञान जगतात ती अनोखी मानली जाते.

उचीकोशी आपल्या मित्रांसमवेत जपानमधील प्रसिद्ध माऊंट रोकोमध्ये ट्रॅकिंगसाठी गेले होते. ट्रॅकिंग करून त्यांचे मित्र परतले, मात्र उचीकोशी परतले नाहीत. रस्ता चुकलेले उचीकोशी नदी शोधू लागले. नदी सापडल्यानंतर ते पाण्यात उतरले, मात्र काही वेळानंतर ते एका दगडाला जाऊन धडकले. त्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. थंडी वाढत होती, त्यांच्याजवळ केवळ थोडेसे पाणी आणि एक सॉसचे पॅकेट होते. त्यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर त्यांना एवढी गाढ झोप लागली की ते चक्क 24 दिवस उटलेच नाहीत. ते जखमी अवस्थेत काहीही न खाता-पिता जिवंत होते. त्यांच्यावर एका गिर्यारोहकची नजर पडली आणि उचीकोशी यांना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांच्या शरीराचे तापमान होते केवळ 22 अंश सेल्सिअस आणि त्यांच्या अवयवांनी जवळजवळ काम करणे बंद केले होते तरही ते जिवंत असल्याने डॉक्टर हैराण झाले. दोन महिन्यांच्या उपचारानंतर उचीकोशी बरे झाले? याला चमत्कार म्हणायचा की आणखी काही.

Back to top button