

वॉशिंग्टन : आपण जगातील अशा एका शापित बाहुलीची माहिती घेणार आहोत जिने अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. ज्यांनी ही बाहुली आपल्याजवळ ठेवली त्यांच्याबाबत या भयावह घटना घडल्या. ही बाहुली फ्लोरिडातील रॉबर्ट युजीन ओटा या मुलाला 1906 मध्ये त्याच्या नोकराने दिली होती. त्या नोकराला काळी जादू येत होती, असे सांगितले जात आहे. त्या नोकराला रॉबर्टचे कुटुंब अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे त्याने बाहुलीवर काळी जादू केली आणि रॉबर्टला भेट दिली. ही बाहुली मिळाल्यानेे छोटा रॉबर्ट खूपच आनंदी होता. लवकरच त्याने त्या बाहुलीला आपला बेस्ट फ्रेंड मानले. तिच्याबरोबर तो खेळत होता आणि झोपतही होता.
रॉबर्ट त्या बाहुलीला नेहमीच आपल्याबरोबर नेत होता. रोज बाहुलीला नवे कपडे घालत होता. मात्र, काही काळानंतर परिस्थिती बदलली. रॉबर्ट त्या बाहुलीच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, हळहळू घरातील वस्तू गायब होऊ लागल्या. आई-वडिलांनी रॉबर्टला खूप समजावले; पण त्याने काहीच ऐकले नाही. एक दिवस ती बाहुली रॉबर्टकडे वेगळ्याच नजरने पाहू लागली. त्यानंतर रॉबर्ट खूपच घाबरला. रॉबर्टचे मानसिक संतुलन ढासळले. घरची परिस्थितीही खूपच बिघडली. त्यानंतर त्याचे अख्खे कुटुंब त्या बाहुलीमुळे उद्ध्वस्त झाले.