विशिष्ट गंधामुळे डास होतात आकर्षित | पुढारी

विशिष्ट गंधामुळे डास होतात आकर्षित

न्यूयॉर्क : डास नावाचा उपद्रवी जीव का निर्माण झाला असावा असे अनेकांना वाटत असते. कानाजवळील त्यांची कर्कश गुणगुण, त्रस्त करणारा दंश आणि या दंशातूनच फैलावणारे गंभीर आजार यामुळे डासांचा वैताग येतच असतो. काहींना डास अधिक त्रस्त करतात तर काहींना कमी. हे का घडत असावे याबाबत सातत्याने संशोधन सुरू असते. आता याबाबत एक नवे संशोधन झाले आहे.

काही लोकांसाठी डास हे चुंबकासारखे आकर्षित होतात. नवीन संशोधनाआधारे या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वैज्ञानिकांनी यामागची कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

वैज्ञानिकांच्या मते, काही व्यक्तींच्या शरीरातून एक प्रकारचा गंध बाहेर पडतो, ज्यामुळे डास या व्यक्तीकडे आकर्षित होतात. ते सारखे त्याच्याकडे आकर्षिले जातात आणि त्याला चावा घेतात.

विशिष्ट गंधामुळे डास व्यक्तीकडे आकर्षित होतो आणि त्याला चावतो असे आढळून आले आहे. मनुष्याच्या त्वचेतून फॅटी अ‍ॅसिड बाहेर पडते. त्याला एकप्रकारचा गंध असतो. त्यामुळे डास त्या व्यक्तीकडे सारखे आकर्षित होतात.

हे नवीन संशोधन ‘सेल’ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यामुळे यापूर्वीच्या डास चावण्याची सर्व कारणे बाजूला सारली आहे. ज्याच्या शरीरातून कार्बोक्सिल अ‍ॅसिड जास्त प्रमाणात बाहेर पडते, त्या व्यक्तींकडे डास जास्त आकर्षित होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. अशा व्यक्ती डासांसाठी चुंबकासारखे काम करतात.

Back to top button