शाळेत सापडला दुसर्‍या महायुद्धातील रेडिओ अ‍ॅक्टिव्ह कचरा | पुढारी

शाळेत सापडला दुसर्‍या महायुद्धातील रेडिओ अ‍ॅक्टिव्ह कचरा

वॉशिंग्टन : मानवनिर्मित कचरा सध्या प्रत्येक ठिकाणी पडलेला दिसून येतो. यामध्ये रस्त्याकडेला, रेल्वेलाईन, पर्वत, सार्व. ठिकाणे आणि समुद्र या ठिकाणांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मात्र, अमेरिकेतील एका शाळेतही असाच कचरा मिळाला. तुम्ही विचाराल यात काय आश्चर्य? मात्र, ज्यावेळी या कचर्‍याची तपासणी झाली, त्यावेळी सर्वांनाच प्रचंड धक्का बसला. कारण, हा कचरा साधासुधा नव्हता, तर तो दुसर्‍या महायुद्धातील रेडिओ अ‍ॅक्टिव्ह कचरा होता.

दुसर्‍या महायुद्धातील कचर्‍याने प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. ‘डेली स्टार’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मिस्सौरीतील सेंट लुईसच्या जैना एलिमेंटरी स्कूलमध्ये दुसर्‍या महायुद्धातील तोसुद्धा रेडिओ अ‍ॅक्टिव्ह कचरा सापडला. यासंदर्भातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ज्या शाळेत हा रेडिओ अ‍ॅक्टिव्ह कचरा सापडला, त्याच ठिकाणी दुसर्‍या महायुद्धादरम्यान रेडिओ अ‍ॅक्टिव्ह शस्त्रे तयार करण्यात येत होती.

‘बोस्टन केमिकल डेटा कॉर्प’च्या वतीने जाहीर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले की, हा रेडिओ अ‍ॅक्टिव्ह कचरा असून त्याच्यामुळे प्रसंगी नुकसानही पोहोचू शकले असते. या कचर्‍याचे गेल्या ऑगस्टमध्ये नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांची तपासणी केली असता ते रेडिओ अ‍ॅक्टिव्ह पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, याबाबत शिक्षक, पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Back to top button