सर्वात मोठा सॉफ्टवेअर वर्ग! | पुढारी

सर्वात मोठा सॉफ्टवेअर वर्ग!

न्यूयॉर्क : जगाच्या पाठीवर अनेक अनोखे विक्रम होत असतात. आता कोलंबियाच्या मेडेलिनमध्ये जगातील सर्वात मोठा सॉफ्टवेअरचा वर्ग भरवल्याचा विक्रम नोंदवला आहे. या वर्गात 3 हजार 119 विद्यार्थी सहभागी झाले होते. हा जागतिक विक्रम आहे. स्थानिक प्रशासनाने सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉॅफ्टच्या मदतीने त्याचे आयोजन केले. देशभरातील 220 संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. यादरम्यान तरुणांना ‘फ्यूचर कम्प्युटिंग’ विषयासह एक वेबसाईट प्रोग्रामही शिकवण्यात आला.

या आयोजनात 10 व अकरावी वर्गातील विद्यार्थी सहभागी झाले. महापौर क्वंटरो कॅले म्हणाले, मेडेलिनला सॉफ्टवेअर व्हॅली बनवण्याचे स्वप्न आम्ही अनेक वर्षांपूर्वी पाहिले होते. ते आता साकारू लागले आहे. ते म्हणाले, सर्व जिल्ह्यांत एक हजार कॉम्प्युटर दिले जातील. या उपक्रमाद्वारे 1.52 लाख विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. 586 विद्यार्थी-विद्यार्थिनींसह स्पेनने 2018 मध्ये जागतिक विद्यार्थ्यांनी मेक्सिकोमध्ये एकाच वेळी वर्ग घेऊन कामगिरी केली होती 900 विद्यार्थ्यांनी असा वर्ग 2019 मध्ये आयोजित करून विक्रम नोंदवला होता.

Back to top button