जगातील ४० टक्के शार्क आणि रे मासे नामशेष होण्याच्या मार्गावर | पुढारी

जगातील ४० टक्के शार्क आणि रे मासे नामशेष होण्याच्या मार्गावर

सिडनी : जगभरातील 40 टक्के शार्क आणि रे मासे विलुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. बेसुमार मासेमारी आणि हवामान बदल ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. या जलचरांवर गेल्या आठ वर्षांपासून करण्यात आलेल्या संशोधनानंतर असे दिसून आले की 2014 मध्ये ते लुप्त होण्याचा धोका 24 टक्के होता, तो आता दुप्पट झाला आहे.

हवामान बदलामुळे (क्लायमेट चेंज) या जलचरांच्या समस्येत वाढ होत आहे. त्यांच्या नैसर्गिक अधिवासात घट होत असून समुद्राचे तापमान वाढत असल्याने अनेक प्रकारची संकटे निर्माण झाली आहेत.

संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार 2014 मध्ये 1041 पैकी 181 मासे लुप्त होण्याचा धोका होता. हा आकडा आता वाढून 391 झाला आहे. या माशांच्या घटत्या संख्येचे एक कारण प्रदूषणही आहे.

समुद्रातील प्रदूषणामुळे शार्क आणि रे मासे यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो. प्रदूषण 6.9 टक्क्यांपर्यंत अशा माशांवर परिणाम करते. तापमानवाढीमुळे या माशांचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका वाढतो. माशांच्या तीन प्रजाती तर गेल्या 85 वर्षांपासून दिसल्याही नाहीत. त्यामध्ये ‘लॉस्ट शार्क’, ‘जावा स्टिंगारी’ आणि ‘रेड सी टॉरपीडो’ यांचा समावेश आहे.

Back to top button