भारतात धावतेय ‘शाकाहारी’ रेल्वे | पुढारी

भारतात धावतेय ‘शाकाहारी’ रेल्वे

नवी दिल्ली : रेल्वेचा प्रवास आरामदायी प्रवास म्हणून ओळखला जातो. लोक घरातून जेवण व अन्य खाण्याचे पदार्थ तयार करून ते प्रवासादरम्यान रेल्वेत खात असतात. रेल्वेमध्येही हवे ते खाद्यपदार्थ मिळत असतात. यामध्ये शाकाहारी व मांसाहारी या दोहोंचा समावेश असतो. मात्र, जर रेल्वेमध्ये केवळ शाकाहारी जेवण मिळत असेल तर शाकाहारींसाठी ते अधिक आनंददायी ठरते.

जगात अनेक रेल्वे अशा आहेत की, त्यामध्ये केवळ शाकाहारच पुरविला जातो. भारतातही अशी एक रेल्वे धावते. त्यामध्ये केवळ शाकाहारीच जेवण मिळते. या रेल्वेचे नाव ‘वंदे भारत’ असे आहे. दिल्लीहून जम्मू आणि काश्मीरमधील कटराला जाणार्‍या या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये केवळ शाकाहारीच जेवण मिळते. तेथे अंडी अथवा मांसाहारी जेवण बिल्कूल मिळत नाही. मेनू कार्डमधून मांसाहारी पदार्थ काढून टाकण्यात आले आहेत.

‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही पूर्णपणे व्हेज आणि हायजेनिक आहे. आयआरसीटीसी व सात्विक कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यात झालेल्या एका करारान्वये या रेल्वेला सात्विक प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या करारान्वये कोणत्याही प्रवाशाला मांसाहारी जेवण देण्यात येत नाही, अथवा ते आणण्यासाठी परवानगी देण्यात येत नाही. सध्या या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Back to top button