‘या’ गावात 75 वर्षांपासूनचा ‘ट्रॅफिक जाम’! | पुढारी

‘या’ गावात 75 वर्षांपासूनचा ‘ट्रॅफिक जाम’!

लंडन : जगाच्या पाठीवर कुठेही ट्रॅफिक जामची समस्या पाहायला मिळू शकते. सर्वसाधारणपणे हा ट्रॅफिक जाम तास, दोन तास किंवा अगदी सहा ते आठ तासांचाही असतो व त्यानंतर मार्ग मोकळा होतो. मात्र, एका गावात चक्क 75 वर्षांपासून जणू काही ट्रॅफिक जामच लागला असल्यासारख्या ओळीने गाड्या उभ्या आहेत!

दक्षिण बेल्जियममधील गावात असा अनोखा ‘ट्रॅफिक जाम’ दिसतो. चॅटेलॉननजीकच्या एका जंगलाच्या मध्यभागी अशा गंजलेल्या व ओळीने उभ्या असलेल्या गाड्यांची जणू स्मशानभूमीच आहे. या गाड्या त्यावेळी तिथे तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याच्या होत्या. दुसर्‍या महायुद्धानंतर सर्व तुकड्या पुन्हा अमेरिकेत परतल्या. मात्र, या मोटारी सोबत घेऊन जाणे परवडणारे नव्हते. ज्यांना त्यांच्या मोटारी परत हव्या होत्या त्यांना संपूर्ण खर्च करून या गाड्या परत आणाव्या लागणार होत्या. त्यामुळे या मोटारी तिथेच सोडून सर्व अधिकारी अमेरिकेत परतले. या गाड्या आजही तिथे एकामागून एक पार्क झालेल्या पाहायला मिळतात. जणू काही भला मोठा ट्रॅफिक जामच लागला असल्यासारखे हे द़ृश्य दिसते. या ठिकाणी अनेक झाडे-झुडपेही उगवलेली आहेत.

Back to top button