…आणि पंधराशे वर्षांपूर्वीचे रोमन युग अवतरले! | पुढारी

...आणि पंधराशे वर्षांपूर्वीचे रोमन युग अवतरले!

लंडन : इतिहासातील अनेक घटना नाट्यरूपांतर करून जिवंत ठेवल्या जात असतात, त्यांची स्मृती जागवली जात असते. त्यासाठी जगभरात विविध प्रकारचे उत्सवही आहेत. रोमानियातही असाच एक उत्सव आहे ज्यामध्ये 1500 वर्षांपूर्वीचे रोमन युग साकार केले जाते. दक्षिणेकडील रेस्का गावात स्थानिक ग्रामस्थ या उत्सवाचे आयोजन करतात. त्यावेळी रोमन सैनिकांसारखा वेश परिधान करून विशिष्ट घटनांचे नाट्यरूपांतर केले जाते.

चौथ्या ते 15 व्या शतकापर्यंत हे क्षेत्र रोमन साम्राज्यातील पूर्व डेसियान प्रांताचा एक भाग होते. डेसियान प्रांतातील अनेक समुदाय ट्रोजन संघर्षाशी संबंधित आहेत. तो काळ हुबेहूब साकारण्यासाठी या नाट्यातील सहभागी कलावंतांनी विशिष्ट पोशाखही परिधान केले होते. या नाट्यामुळे रोमन काळातील समरांगण साकार करण्यात आले. रेस्काचा परिसर सध्या रणनीतीच्या पातळीवर महत्त्वाचा ठरला आहे. युक्रेनमधील युद्धामुळे रेस्का प्रशासनाकडे अमेरिकन क्षेपणास्त्र संरक्षण ठिकाणाची जबाबदारी आहे.

Back to top button