व्हिटॅमिन बी 2 ने मिळतो ‘मायग्रेन’पासून दिलासा | पुढारी

व्हिटॅमिन बी 2 ने मिळतो ‘मायग्रेन’पासून दिलासा

न्यूयॉर्क : ‘मायग्रेन’ हा एक सामान्य आजार मानण्यात येत असला तरी त्यामध्ये मोठी डोकेदुखी आणि चक्कर येणे अशा समस्या जाणवतात. ‘मायग्रेन’ ही एक अशी न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे की, यात डोक्याच्या एका अथवा दोन्ही बाजूने प्रचंड वेदना जाणवत असतात. या वेदना काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंतही असू शकतात. हा आजार कधी कधी जेनेटिकही असू शकतो. तसेच डिहायड्रेशन, स्ट्रेस आणि डायटरी फॅक्टर्समुळे तो होऊ शकतो. मात्र, ‘मायग्रेन’चा वारंवार त्रास होत असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम आरोग्यावर होत असतो.

दरम्यान, हेल्थलाईनच्या अहवालानुसार व्हिटॅमिन बी 2 अथवा मेलाटोनिन यासारखे पोषक तत्त्व ‘मायग्रेन’चा हल्ला रोखू शकतात. व्हिटॅमिन बी 2 हे शरीरातील अनेक प्रकारच्या मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये उपयोगी ठरते. हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन त्रासदायक मायग्रेनचा विकास रोखून धरते. तसेच हे पोषक तत्त्व कोशिकांना एनर्जी देण्याचे काम करते.

खरेतर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ‘मायग्रेन’चा हल्ला होऊ शकतो. तसेच व्हिटॅमिन डी हे मेंदूतील इनफ्लेमेशनशी लढा देत असते. तसेच ते मॅग्नेशियम एब्जॉर्पशनला बळ देते आणि ‘मायग्रेन’च्या हल्यावेळी वाढणार्‍या सबस्टॅन्सची निर्मिती कमी करते. एकूणच व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 2 च्या सेवनामुळे ‘मायग्रेन’चा धोका आणि त्रास कमी करण्यास मदत मिळते.

Back to top button