आठवड्यातून चार दिवस वाईट स्वप्ने पडल्यास... | पुढारी

आठवड्यातून चार दिवस वाईट स्वप्ने पडल्यास...

लंडन : स्वप्नांबाबत प्राचीन काळापासूनच माणसाला कुतुहल आहे. याबाबत वेळोवेळी संशोधनेही होत आली आहेत. काही स्वप्नं चांगली असतात तर काही वाईट, भीतीदायकही असतात. काही लोकांना नेहमी वाईट स्वप्नं पडत असतात व ते झोपेतून दचकून जागे होतात. आता एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की 35 ते 65 वर्षे वयात आठवड्यातून चार दिवस वाईट स्वप्नं पडल्यास स्मरणशक्ती जाण्याची जोखिम वाढते.

वास्तविकपणे वाईट स्वप्नांमुळे गंभीर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याची शक्यता वाढत असल्याचे बि—टनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे 79 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना केवळ 5 टक्केच वाईट स्वप्ने येतात. 41 टक्के महिला आणि 59 टक्के पुरुषांवर वाईट स्वप्नांचा खोलवर परिणाम होतो. हा मध्यवर्ती मज्जासंस्थेचा एक आजार असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. यामुळे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील कामकाजावरही प्रभाव पडतो.

काही लोकांना अवयवांमध्ये कंपनाचा त्रास जाणवतो. ज्या लोकांनी आठवड्यातून कमीत कमी एकदा वाईट स्वप्न पाहिले त्यांच्यामध्ये पुढील एक दशक वाईट स्वप्न न पाहणार्‍यांच्या तुलनेत चार पट अधिक स्मरणशक्ती गमावण्याची जोखिम असते, असेही दिसून आले आहे. कमी व्यायाम, धूम—पानामुळेही स्मरणशक्ती जाण्याचा धोका असतो असे प्रमुख संशोधक डॉ. अबिदेमी ओटाइकू यांनी म्हटले आहे.

Back to top button