तब्बल 59 वर्षांनंतर पृथ्वीच्या जवळ येणार गुरू

तब्बल 59 वर्षांनंतर पृथ्वीच्या जवळ येणार गुरू

वॉशिंग्टन : आपल्या सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह असलेला गुरू 25 सप्टेंबरला पृथ्वीच्या अधिक जवळ येईल. पृथ्वी आणि गुरूमधील अंतर इतके कमी होण्याची ही 59 वर्षांनंतरची पहिलीच घटना असेल. 'नासा'ने म्हटले आहे की, हा विशाल ग्रह सूर्याच्या ठीक विपरीत दिशेला दिसून येईल. गुरूच्या या दिशा बदलण्याच्या घटनेला वैज्ञानिक भाषेत 'अपोझिशन' असे म्हटले जाते. गुरूसाठी 'अपोझिशन' ही एक सामान्य बाब आहे. ही घटना दर तेरा महिन्यांनी एकदा होत असते. दरवर्षी पृथ्वी आणि गुरू बरेच जवळही येतात; पण यावेळी या दोन ग्रहांमधील अंतर अतिशय कमी असेल.

या घटनेमुळे पृथ्वीवरून गुरू अधिक मोठ्या आकारात दिसून येईल. 25 आणि 26 सप्टेंबरला सूर्य व गुरूच्या दरम्यान पृथ्वी असेल व या घटनेला 'पेरिगी' असे म्हटले जाते. 25 सप्टेंबरला पृथ्वी आणि सूर्यादरम्यानचे अंतर सर्वात कमी होईल आणि 26 सप्टेंबरला तो सूर्याच्या उलट दिशेस दिसेल. पृथ्वीच्या बरेच जवळ आल्याने हा ग्रह पृथ्वीवरून अधिक चमकदार व मोठा दिसेल.

अवकाश निरीक्षण करणार्‍या लोकांसाठी ही एक चांगली संधी असेल. आकाश निरभ्र असेल, तर रात्रीच्या वेळी दुर्बिणीच्या सहाय्याने गुरूचे निरीक्षण करता येऊ शकेल. अलाबामामधील 'नासा'चे मार्शल स्पेस फ्लाईट सेंटरमधील एक खगोलशास्त्रज्ञ अ‍ॅडम कोबेल्स्की यांनी सांगितले की, 26 सप्टेंबरच्या आधी व नंतरही काही दिवस गुरू बराच चमकदार व मोठा दिसून येईल. 25 व 26 सप्टेंबरला त्याचे जवळून निरीक्षण करता येऊ शकेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news