रोज चहा पिल्याने घटतो मधुमेहाचा धोका!

रोज चहा पिल्याने घटतो मधुमेहाचा धोका!

बीजिंग : दिवसभरातून चार कप चहा पिल्याने 'टाईप-2' मधुमेहाचा धोका कमी होतो, असे कुणी म्हटले, तर आपल्याला निश्चितच आश्चर्य वाटेल; मात्र सलग दहा वर्षे रोज चार कप चहा पिल्याने मधुमेहाचा धोका 17 टक्क्यांपर्यंत कमी होतो, असे चिनी संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामध्ये ब्लॅक, ग्रीन आणि अन्य प्रकारच्याही चहाचा समावेश आहे. हा चहा बिनसाखरेचा असेल, तर अधिक लाभ होतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

चीनच्या वुहान युनिव्हर्सिटीत याबाबतचे संशोधन झाले. यापूर्वी झालेल्या 19 संशोधनांचा हवाला देत वुहान युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शियालिंग ली यांनी सांगितले की, जुन्या अनुमानानुसार चहामध्ये दूध मिसळलेले असेल, तर लाभ कमी होतो; मात्र नव्या संशोधनानुसार दुधाचा चहाही तितकाच लाभदायक ठरतो जितका ब्लॅक टी. अन्य एका मेटा-अ‍ॅनालिसिसमध्ये अमेरिका, आशिया व युरोपच्या आठ देशांमधील सुमारे अकरा लाख लोकांना सहभागी करून घेण्यात आले.

त्यामध्ये आढळले की, चहा न पिणार्‍यांच्या तुलनेत जे लोक एका दिवसात एक, दोन किंवा तीन कप चहा पितात, त्यांच्यामध्ये 'टाईप-2' मधुमेहाचा धोका चार टक्के कमी होतो. जे लोक रोज चार किंवा त्यापेक्षा अधिक कप चहा पितात त्यांच्यामध्ये मधुमेहाचा धोका 17 टक्के कमी होतो. भारतात प्रत्येक अकरापैकी एक व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे. त्यापैकी 90 ते 95 टक्के लोकांना 'टाईप-2' मधुमेह आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news