दात व तोंडाविषयीची रंजक माहिती… | पुढारी

दात व तोंडाविषयीची रंजक माहिती...

नवी दिल्ली : दंतचिकित्सेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. मौखिक आरोग्याबाबत लोकांना जशी फारशी जागरूकता असत नाही तसेच दात व तोंडाबाबतची विशेष माहितीही नसते. दातांविषयीची ही काही रंजक माहिती…

‘टूथ इनॅमल’ म्हणजे दातांवर एक पातळ आवरण असते व त्यामुळे आपले दात सुरक्षित राहतात. दातांचा हा थर अतिशय मजबूत असतो. जर तुम्हाला विचारले की शरीरातील सर्वात कठीण भाग कोणता आहे तर बहुतेक जण ‘हाड’ असेच उत्तर देतील. मात्र, सत्य हे आहे की दातांवरील थर म्हणजेच ‘टूथ इनॅमल’ हा मानवी शरीरातील सर्वात कठीण (हार्डेस्ट) भाग आहे. इनॅमलला मोहस हार्डनेस स्केलच्या आधारे 5 गुण दिले जातात. ते स्टीलइतकेच आहेत. याचा अर्थ टूथ इनॅमल हे स्टीलइतकेच मजबूत असते. ब—श केल्यानंतरही तुमच्या तोंडात 700 हून अधिक प्रजातीचे जीवाणू आढळतात.

अर्थात प्रत्येक जीवाणू हा शरीरासाठी हानिकारक नसतो. एका माहितीनुसार 25 टक्के लोक दिवसातून दोनवेळा दात स्वच्छ करीत नाहीत. त्यामुळे त्यांचे दात लवकर पडण्याची शक्यता 33 टक्क्यांनी वाढते. ज्याप्रमाणे दोन व्यक्तींचे फिंगरप्रिंट (बोटांचे ठसे) एकसारखे नसतात त्याचप्रमाणे दोन व्यक्तींचे ‘टूथ प्रिंट’ एकसारखे नसतात. याचा अर्थ जगातील इतर कोणत्याही व्यक्तीचे दात, इनॅमल इत्यादींची मांडणी तुमच्या दातांसारखी असणार नाही. आपल्या तोंडात 1 तासात 30 मिली लाळ तयार होते. तिचा दर अन्न खाताना जास्त आणि झोपताना कमी असतो. एका सामान्य व्यक्तीच्या तोंडातून आयुष्यात 20 हजार लिटर लाळ तयार होते!

संबंधित बातम्या
Back to top button