जगातील पहिली ‘उडणारी मोटारसायकल’! | पुढारी

जगातील पहिली ‘उडणारी मोटारसायकल’!

न्यूयॉर्क : उडणारी कार बनल्यानंतर आता उडणारी बाईक म्हणजेच मोटारसायकलही बनली आहे. ‘एरविन्स एक्सटुरिस्मो’ असे या हॉवरबाईकचे नाव आहे. एखाद्या मोठ्या आकाराच्या ड्रोनसारखी दिसणारी ही बाईक उच्च तंत्रज्ञान आणि सेन्सर्सने बनवलेली आहे. ही बाईक डेट्रॉईट ऑटो शोमधून पदार्पण करीत आहे. तत्पूर्वी, तिचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्याचा एक व्हिडीओही आता प्रसिद्ध झाला आहे.

ही बाईक 40 मिनिटे उडू शकते, तसेच तिचा वेग ताशी 62 मैलांपर्यंत जाऊ शकतो. या बाईकमध्ये गॅसोलीन-इलेक्ट्रिक हायबि—ड कावासाकी इंजिन आहे. या बाईकचे वजन सुमारे 299 किलो आहे. या बाईकची किंमत 7,77,000 डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनात ही किंमत सुमारे 6 कोटी 20 लाख 32 हजार 183 रुपये होते. भविष्यात ही उडणारी बाईक स्वस्त होईल असा विश्वास कंपनीच्या सीईओंना वाटतो. जपानमध्ये हॉवरबाईकला विमान मानले जात नसल्याने अशा बाईक वापरण्यास विशेष परवान्याची आवश्यकता नसते. अमेरिकेतील यासंदर्भातील नियम अद्याप स्पष्ट नाहीत. नुकतीच ही बाईक अमेरिकेत आली आहे.

Back to top button