पृथ्वीजवळून जाणार ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पेक्षा मोठा लघुग्रह | पुढारी

पृथ्वीजवळून जाणार ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पेक्षा मोठा लघुग्रह

न्यूयॉर्क : जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजे भारतातील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या नावाने ओळखला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. गुजरातमधील या पुतळ्यापेक्षाही मोठ्या आकाराचा एक लघुग्रह 18 सप्टेंबरला पृथ्वीजवळून जाणार आहे.

या लघुग्रहाचे नाव ‘2005 आरएक्स3’ असे आहे. तो ताशी 62,820 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. 18 सप्टेंबरला तो पृथ्वीपासून 47 लाख किलोमीटर अंतरावरून पुढे जाईल. कॉस्मिक स्केलचा विचार करता हे अंतर जास्त नाही. हा लघुग्रह 2005 मध्ये म्हणजे 17 वर्षांपूर्वी पृथ्वीजवळून गेला होता. त्यावेळेपासून ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने त्याच्यावर नजर ठेवलेली आहे. आता भविष्यात तो मार्च 2036 मध्ये पृथ्वीजवळून पुन्हा जाईल.

‘नासा’ने 10 सप्टेंबरला म्हटले होते की, 11 ते 18 सप्टेंबरदरम्यान पृथ्वीजवळून पाच लघुग्रह जाणार आहेत. त्यामध्येच ‘2005 आरएक्स3’चा समावेश आहे. 11 सप्टेंबरला ‘2022 क्यूएफ’ हा लघुग्रह पृथ्वीजवळून गेला. 12 सप्टेंबरला ‘2008 आरडब्ल्यू’ हा लघुग्रह तर 16 सप्टेंबरला ‘2022 क्यूडी 1’ हा लघुग्रह पृथ्वीजवळून गेला. 18 सप्टेंबरला ‘2005 आरएक्स3’ बरोबरच ‘2022 क्यूबी37’ हा लघुग्रहही पृथ्वीजवळून जाईल.

Back to top button