रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असते मॅग्नेशियम | पुढारी

रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असते मॅग्नेशियम

नवी दिल्ली : शरीराच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारची खनिजेही आवश्यक असतात. त्यामध्ये मॅग्नेशियमचा समावेश होतो. नसा, स्नायू, रोगप्रतिकारक शक्ती यांच्या चांगल्या कार्यासाठी तसेच हाडे मजबूत ठेवण्यासाठी मॅग्नेशियम गरजेचे आहे. तसेच मॅग्नेशियम हे रक्तातील साखरेची पातळी व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही गरजेचे आहे. हृदयाचे ठोके स्थिर ठेवण्यासाठीही हे पोषक तत्त्व मदत करते.

शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी झाल्यास थकवा, भूक न लागणे, मळमळ, उलट्या, अनिद्रा, स्नायूंच्या समस्या आणि अन्यही काही समस्या निर्माण होतात. गंभीर स्वरूपाची मॅग्नेशियमची कमतरता असेल तर उच्च रक्तदाब, मधुमेह, धमन्यांचे रोग आणि ऑस्टियोपोरोसिससह अनेक आजार निर्माण होतात. हिरव्या भाज्या, केळी, गव्हासारखे धान्य, सुका मेवा, डार्क चॉकलेट, टोफू यामध्ये मॅग्नेशियम असते. प्रौढ पुरुषांसाठी दिवसाला 400 ते 420 एम.जी., तर प्रौढ महिलांसाठी 310 ते 320 मॅग्नेशियम आवश्यक असते.

Back to top button