महाराणीचे ‘सिक्रेट लेटर’ 2085 मध्येच वाचता येणार!

महाराणीचे ‘सिक्रेट लेटर’ 2085 मध्येच वाचता येणार!
Published on
Updated on

सिडनी : महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी लिहिलेले एक गोपनीय पत्र ऑस्ट्रेलियात सिडनीच्या क्वीन व्हिक्टोरिया बिल्डिंगमधील तिजोरीत ठेवण्यात आलेले आहे. हे पत्र नोव्हेंबर 1986 मध्ये लिहिले होते. असे म्हटले जाते की या पत्रात महाराणीने सिडनीच्या लोकांना संबोधित केलेले आहे. मात्र, त्यामध्ये नेमके काय आहे हे सन 2085 मध्येच उघड होईल. तोपर्यंत हे पत्र असेच तिजोरीबंद राहणार आहे.

या पत्रात महाराणीने काय लिहिले आहे याची माहिती खुद्द त्यांच्या खासगी कर्मचार्‍यांनाही नाही. हे पत्र सध्या एका प्रतिबंधित क्षेत्रातील काचेच्या आत आहे. सन 1898 मध्ये महाराणीच्या पणजी व ब्रिटनच्या तत्कालीन महाराणी व्हिक्टोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त सिडनीत एका भवनाची निर्मिती करण्यात आली होती.

त्याच्या जीर्णोद्धारानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराणी एलिझाबेथ द्वितीय आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे रहस्यमय पत्र लिहिले होते. त्यावेळी त्यांनीच हे पत्र कधी उघडावे याचे निर्देश दिले होते आणि सिडनीच्या भावी महापौरांना संबोधित केले होते. नोटमध्ये लिहिले आहे की इसवी सन 2085 मध्ये आपण निवडलेल्या एखाद्या दिवशी हा लिफाफा उघडून सिडनीच्या नागरिकांना हा संदेश वाचून दाखवावा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news