हातावरही दिसतात मधुमेहाची लक्षणे, जाणून घ्या अधिक | पुढारी

हातावरही दिसतात मधुमेहाची लक्षणे, जाणून घ्या अधिक

नवी दिल्ली : जगात सध्या मधुमेही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजाराचे मुख्य कारण म्हणजे वजन वाढणे आणि खराब लाईफस्टाईल. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाचे दोन प्रकार असतात, पहिला टाईप 1 आणि दुसरा टाईप 2 डायबिटीस.

मधुमेहाचे वेळीच निदान झाले आणि त्यावर उपचार सुरू केल्यास त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य होते. तज्ज्ञांच्या मते, हातावरही मधुमेहाची काही लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांच्या मदतीने मधुमेहाची पूर्वकल्पना मिळू शकते. ‘विली क्लिनिकल हेल्थकेअर हब’ने केलेल्या संशोधनानुसार ज्या लोकांमध्ये मधुमेहाची तक्रार असते, त्यांच्या हातावर या आजाराची लक्षणे दिसू शकतात. जर एखाद्याला मधुमेह असेल तर त्याच्या हाताच्या नखाजवळची त्वचा लाल होत असते. यादरम्यान नखाजवळच्या त्वचेवरही नजर ठेवण्याची गरज असते. कारण त्यामधून कधी कधी रक्त येत असते. जर खरोखरच नखाजवळची त्वचा लाल झालेली असेल आणि तेथून रक्त येत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.

नखाजवळ ब्लड सर्क्युलेशन होत नसल्याने तेथील कोशिका डेड होतात. अशीच स्थिती नखाचीही होते. मधुमेह जडला असेल तर वरील स्थिती पायांच्या बोटांवरही दिसून येते. जर पायांच्या बोटांची नखे पिवळी पडलेली असतील आणि ती तुटत असतील, तर हे सुद्धा मधुमेहाचे लक्षण असू शकते. याशिवाय एखाद्याला रात्रीच्या सुमारास वारंवार लघवीला होत असेल तर ते सुद्धा मधुमेहाचे लक्षण असू शकते. असे असेल तर डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.

Back to top button