शाब्दिक अपमान असतो थपडेसारखाच! | पुढारी

शाब्दिक अपमान असतो थपडेसारखाच!

नवी दिल्‍ली : महाभारतात म्हटले आहे की सज्जन माणसाला शाब्दिक अपमानही मृत्यूसारखाच असतो. आपल्याकडे ‘शहाण्याला शब्दाचा मार’ असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. आता यावर परदेशातील संशोधकांनीही शिक्‍कामोर्तब केले आहे. नेदरलँडमधील संशोधकांनी म्हटले आहे की शब्दांचा मार हा एखाद्या जोरदार थपडेसारखाच वेदनादायी असतो व त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो.

संशोधकांनी याबाबत एक पाहणी केली होती व सहभागी लोकांच्या मेंदूतील हालचाली रेकॉर्ड केल्या. त्यामधून आढळून आले की कटू शब्दांचा आपल्या जीवनावर बराच प्रभाव पडतो. शब्दांनी केलेला मौखिक अपमान गालावर मारलेल्या थपडीसारखाच असतो. त्याच्यामुळे मेंदूत नकारात्मक भावना निर्माण होतात. अपमान हा आपल्या ‘स्व’च्या विरुद्ध असतो आणि आपल्या प्रतिष्ठेसाठीही धोकादायक असतो. तो आपल्या अंतःकरणात दीर्घकाळ टिकून राहतो. युट्रेक्ट युनिव्हर्सिटीतील डॉ. मारिजन स्ट्रूकस्मा आणि त्यांच्या टीमने याबाबतचे संशोधन केले.

Back to top button