दोन चंद्र असूनही लाल ग्रह पूर्ण सूर्यग्रहणापासून वंचितच | पुढारी

दोन चंद्र असूनही लाल ग्रह पूर्ण सूर्यग्रहणापासून वंचितच

कॅलिफोर्निया : आपली पृथ्वी आणि चंद्र यांचे तंत्र अत्यंत अनोखे आहे. यामधील एक महत्त्वाचे म्हणजे आकारात सूर्य आणि चंद्र यांच्यात मोठी तफावत असली, तरी हे दोन्ही खगोलीय पिंड पृथ्वीवरून एकाच आकाराचे दिसत असतात. यामुळेच पृथ्वीवरचे सूर्यग्रहणही अत्यंत अनोखे असते. यामध्ये चंद्र हा सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो. मात्र, मंगळ ग्रहाच्या बाबतीत असे घडत नाही.

‘फोबोस’ आणि ‘डिमोस’ असे मंगळाच्या दोन चंद्रांची नावे आहेत. या दोन्ही चंद्रांमुळे मंगळावर सूर्यग्रहण लागत असतात. मात्र, मंगळ आणि पृथ्वीवरील सूर्यग्रहणात मोठा फरक दिसून येतो. नासाच्या अपॉर्च्यूनिटी, क्यूरिओसिटी व पर्सिव्हरन्स रोवरने मंगळावरील सूर्यग्रहणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले आहे. हे व्हिडीओ नासाने नुकतेच जारी करून त्यांच्यातील फरक स्पष्ट केला.

तसे पाहिल्यास फोबोस 6.65 तासांत, तर डिमोस 30.35 तासांत मंगळाभोवतीचा एक फेरा पूर्ण करतात. पृथ्वीच्या चंद्राच्या तुलनेत मंगळाचे चंद्र आकाराने फारच लहान आहेत. यामुळे ते तांत्रिकद‍ृष्ट्या पूर्ण सूर्यग्रहण लावू शकत नाहीत. ज्यावेळी फोमोस व डिमोस हे मंगळ आणि सूर्याच्या मध्ये येतात, त्यावेळी ते आकाराने लहान असल्याने सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाहीत. यामुळे मंगळावर एकादा डाग असल्यासारखी त्यांची छाया पडते. आकारात असमान असल्याने या दोन्ही चंद्रांची मंगळावर पडणारी सावलीसुद्धा समान नसते. यामुळे त्यांचा काहीच प्रभाव जाणवत नाही.

Back to top button