अमेरिकेत रंगते पाण्याबाहेर उडणारे मासे पकडण्याची स्पर्धा | पुढारी

अमेरिकेत रंगते पाण्याबाहेर उडणारे मासे पकडण्याची स्पर्धा

कॅलिफोर्निया : प्रत्येक जीवाला निसर्गाने काही ना काही तरी खास दिले आहे. असाच एक जीव म्हणजे मासा होय. हा जलचर चक्‍क पाण्याबाहेरही उड्या मारतो. हे पाण्याबाहेर उडणारे मासे पकडण्यासाठी एका खास स्पर्धेचे आयोजन केले जाते. यामध्ये लोक एक संघ बनून भाग घेतात.

अमेरिकेतील इलिनॉयस येथील एका नदीत आयोजित करण्यात येणार्‍या या स्पर्धेला ‘रेड नेक फिशिंग टूर्नामेंट’ असे म्हटले जाते. दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. पण तुम्हाला वाटेल की ही एक बोअरिंग स्पर्धा असून अनेक तास घालवल्यानंतर एखादा मासा हाती लागत असणार, पण या स्पर्धेत मासे मिळणे अजिबात अवघड नाही. कारण शेकडोंच्या संख्येने म्हणजे पॉपकॉर्नसारखे मासे पाण्याबाहेर उडत असतात. मात्र, या माशांना पकडण्यासाठी चलाखी दाखवावी लागते एवढेच. निर्धारित वेळेत जो संघ जास्त मासे पकडतो, तो विजेता ठरतो.

पाण्याबाहेर उडणार्‍या या माशांना ‘कॉर्प’ असे म्हटले जाते. त्या पाण्याबाहेर सूर मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसे पाहिल्यास या स्पर्धेस बेटी डिफोर्ड यांनी सुरुवात केली. त्यांनी सांगितले की, पाण्याबाहेर उड्या मारणार्‍या माशांना पकडण्याचा रोमांचक अनुभव घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येने लोक या स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेचे आयोजन करण्याचे एक वेगळेच कारण आहे. कॉर्प मासे पाण्यातील जीवांना धोका पोहोचवत असतात. तो धोका कमी करण्यासाठीच या माशांना पकडण्याची स्पर्धा आयोजित केली जाते.

संबंधित बातम्या
Back to top button