पाषाणयुगातील पारदर्शक दुर्मीळ स्फटिकांचा शोध | पुढारी

पाषाणयुगातील पारदर्शक दुर्मीळ स्फटिकांचा शोध

लंडन : पश्चिम इंग्लंडमध्ये निओलिथिक काळातील उत्सवस्थळी अनोखे संशोधन झाले आहे. पाषाणयुगातील या ठिकाणी थडगी व अन्य रचनांना सजवण्यासाठी दुमीर्र्ळ प्रकारच्या पारदर्शक क्वार्ट्झचा वापर केला जात असे. अशी शेकडो स्फटिकं त्याठिकाणी सापडली आहेत. त्यांचा वापर होत असताना पाहणेही एक उत्सवच असायचा व लोक ही स्फटिकं जणू काही जादूची असावीत, अशा कुतुहलाने त्यांच्याकडे पाहत असत, असे संशोधकांनी म्हटले आहे.

ही स्फटिकं या उत्सवाच्या जागी 130 किलोमीटरवरून आणण्यात आली होती. पर्वतांच्या पठारावरून आणलेली ही स्फटिकं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये काळजीपूर्वक कापून त्यांचा शोभेसाठी वापर करण्यात आला. मँचेस्टर युनिव्हर्सिटीतील निक ओव्हरटन या पुरातत्व संशोधकाने सांगितले की हे खडे जादूचे असावेत, अशा थाटात अनेक लोक या खड्यांचा वापर करीत असताना पाहायला जमत असावेत. हा एक सोहळाच होत असावा. डॉरस्टोन हिल येथे ही 6 हजार वर्षांपूर्वीचे ठिकाण आहे. तिथे असे 300 खडे सापडले आहेत. ही स्फटिकं अगदी पाण्यासारखी पारदर्शक आहेत. त्यांच्यामधून प्रकाशकिरण गेल्यावर इंद्रधनुष्यी रंगही निर्माण होतात.

Back to top button