तीन वर्षेही झोपते गोगलगाय! | पुढारी

तीन वर्षेही झोपते गोगलगाय!

नवी दिल्ली : कुंभकर्णाची झोप आपल्याला नेहमीच नवलाईची वाटते. मात्र, काही प्राणीही दीर्घनिद्रा घेत असतात. अस्वलांची शीतनिद्रा किंवा बेडकांची अशीच दीर्घकाळाची असते. अगदी गोगलगाय ही अतिशय दीर्घकाळ निद्रावस्थेत राहू शकतात. तब्बल तीन वर्षे झोपणारा हा पृथ्वीतलावरील अनोखा जीव आहे.

गोगलगायींना जिवंत राहण्यासाठी ओलाव्याची गरज असते. त्यामुळे सहसा जून ते सप्टेंबरमध्येच त्यांच्या हालचाली आपल्याला दिसून येत असतात. इतर वेळेस गोगलगायी निष्क्रिय असतात. हवा गरम असेल किंवा हवेत ओलसरपणा नसेल तर गोगलगाय निष्क्रिय अवस्थेत राहतात. याचा अर्थ जोपर्यंत वातावरणात दीर्घ कालावधीसाठी ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत त्या झोपलेल्या अवस्थेतच राहतात.

विशेष म्हणजे छोटासा दिसणारा हा जीव तब्बल 25 वर्षेही जगू शकतो. काही गोगलगायी विषारीही असतात. या अपृष्ठवंशीय म्हणजेच पाठीचा कणा नसलेल्या जीवांमध्ये शंखाच्या व बिनशंखाच्या गोगलगायींचाही समावेश होतो.

Back to top button