जगातील सर्वात लांब मांजर | पुढारी

जगातील सर्वात लांब मांजर

मॉस्को :  सर्वसाधारणपणे मांजराची सरासरी लांबी 23 ते 25 सेंटिमीटरपर्यंत असते; मात्र एक मांजर असे आहे की, ज्याची लांबी एखाद्या दोन वर्षांच्या बालकाच्या उंचीइतकी आहे. अनेक लोक या मांजराला चक्‍क कुत्रेच समजतात.

रशियातील यूलिया मिनिना या महिलेने याच वर्षाच्या प्रारंभी आपल्या पाळीव मांजराची छायाचित्रे व व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केली होती. काही दिवसांमध्येच ही छायाचित्रे व्हायरल झाली. सोशल मीडिया यूजर्स या मांजराच्या आकाराने थक्‍क झाले. तिचा मोठा आकार, पांढरे शुभ— लांब केस आणि मोठे कान पाहून लोकांना साहजिकच आश्‍चर्य वाटले. या मांजराचे वजन 12.5 किलो असून त्याची लांबी 48.5 इंच आहे. या दीड वर्षाच्या मांजराचा आकार मोठा असला, तरी ते आक्रमक नाही. अतिशय शांत स्वभावाचे हे मांजर युुलियाच्या घरात एखाद्या सर्वसामान्य मांजरासारखेच राहते. या मांजराचे नाव आहे

‘केफिर’. युलियाची दोन वर्षांची कन्या अनेचकाबरोबर हे मांजर निवांत खेळत असते. चिमुरडी अनेचका किचनमधील टेबलवर केफिरसाठी खाऊ काढत असते त्यावेळी केफिरही मागील दोन पायांवर उभे राहून आपला खाऊ कधी मिळतो याची वाट पाहत असते. त्यावेळी या दोघांची उंची सारखीच असलेले पाहून अनेक लोक चकीत होतात.

Back to top button