सर्वात बुटका किशोर | पुढारी

सर्वात बुटका किशोर

काठमांडू : नेपाळमधील दोर बहाद्दूर खापांगी हा जगातील सर्वात कमी उंचीचा किशोरवयीन मुलगा ठरला आहे. त्याला पाहिले की एखादा चिमुरडा बालक असावा असे कुणालाही वाटावे; पण त्याचे वय आहे अठरा वर्षे! गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्ने त्याची नोंद ‘जगातील सर्वात कमी उंचीचा किशोरवयीन मुलगा’ म्हणून केली आहे.

दोरचा भाऊ नारा बहाद्दूर खापांगीने म्हटले आहे की माझ्या भावाचा शारीरिक विकास सामान्य झाला नाही त्याबाबत आम्हाला वाईट वाटते; पण त्याच्या कमी उंचीमुळे आता त्याला जगप्रसिद्धीही मिळाली आहे याचा आनंद वाटतो. दोरची उंची अवघी 73.43 सेंटीमीटर म्हणजेच 2 फूट 4.9 इंच आहे. त्याचा जन्म 14 नोव्हेंबर 2004 मध्ये झाला. कमी उंचीमुळे त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

तो आपल्या भावासमवेतच घराबाहेर पडतो. त्याच्यापूर्वी नेपाळच्याच खगेंद्र थापा याच्या नावाची नोंद सर्वात कमी उंचीचा किशोरवयीन म्हणून झाली होती. त्याची उंची केवळ 67 सेंटीमीटर होती. खगेंद्रचा दोन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे.

Back to top button