सर्वाधिक वयाच्या हवाई सुंदरी | पुढारी

सर्वाधिक वयाच्या हवाई सुंदरी

वॉशिंग्टन : गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्ने एका 86 वर्षे वयाच्या अमेरिकन महिलेची जगातील सर्वाधिक काळ सेवा बजावणार्‍या व सर्वाधिक वयाच्या फ्लाईट अटेंडंट म्हणून नोंद केली आहे. या सर्वाधिक वयाच्या हवाई सुंदरीचे नाव आहे बेट्टे नॅश. त्या गेल्या 65 वर्षांपासून एअर होस्टेसचे काम करीत आहेत.

अमेरिकेच्या मॅसाच्युसेटस्मधील बोस्टनच्या त्या रहिवासी आहेत. त्यांनी 1957 मध्ये एअर होस्टेस म्हणून आपल्या नोकरीस सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांना आपल्या पसंतीचा हवाई मार्ग निवडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, नॅश यांनी आपल्या करिअरमधील बहुतांश काळ न्यूयॉर्क-बोस्टन-वॉशिंग्टन या हवाई मार्गावर काम केले. गेल्या साडेसहा दशकांपासून त्या फ्लाईटमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे या मार्गावरून सतत ये-जा करणारे अनेक प्रवासीही त्यांना चांगले ओळखतात.

एका प्रवाशाने म्हटले आहे की मी एका वर्षात शेकडो-हजारो मैलांचा हवाई प्रवास करीत असतो; पण ज्यावेळी बेट्टे विमानात असतात त्यावेळी तो प्रवास सर्वात चांगला ठरतो. बेट्टे नॅश यांचा मुलगा दिव्यांग आहे व त्यामुळे त्यांना रात्र झाली की आपल्या घरी परतावे लागते जेणेकरून मुलाची देखभाल करता येईल.

Back to top button