चार कोटी वर्षांपूर्वीच्या मगरीच्या जीवाश्माचा होणार लिलाव | पुढारी

चार कोटी वर्षांपूर्वीच्या मगरीच्या जीवाश्माचा होणार लिलाव

लंडन : अतिशय सुस्थितीत जतन झालेले 4 कोटी वर्षांपूर्वीच्या मगरीचे जीवाश्म सापडले होते. आता या जीवाश्माचा ग्लासगोमध्ये लिलाव केला जाणार आहे. एका निवृत्त जिऑलॉजिस्टकडील अशा 200 जीवाश्म व नैसर्गिक ऐतिहासिक नमुन्यांपैकी हे एक जीवाश्म आहे.

ही मगर इओसीन काळातील असून तिच्या प्रजातीचे नाव ‘प्लॅलिसुचस पेट्रोलियम’ असे आहे. या मगरीचा 92 सेंटीमीटर लांबीचा सांगाडा या जीवाश्मात स्पष्टपणे दिसतो. चीनमध्ये हे जीवाश्म सापडले होते. आता 10 ऑगस्टला होणार्‍या लिलावात या जीवाश्माला 15 हजार पौंडांपर्यंत किंमत मिळू शकेल असा अंदाज आहे.

या जीवाश्मात प्रागैतिहासिक काळातील मगरीचा जवळजवळ संपूर्ण असा सांगाडा पाहायला मिळत असल्याने या जीवाश्माला वेगळेच महत्त्व आहे. संग्रहातील अन्य जीवाश्मांमध्ये हारड्रोसॉर प्रजातीच्या डायनासोरच्या जीवाश्मभूत अंड्यांचा समावेश आहे. क्रेटाशियस काळातील अखेरच्या टप्प्यातील ही अंडी आहेत. त्यांना 7 हजार पौंडांची किंमत मिळेल असा अंदाज आहे.

Back to top button