कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीर देते ‘हे’ संकेत

कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीर देते ‘हे’ संकेत

नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून 'हाय कोलेस्ट्रॉल' ही एक मोठी समस्या बनली आहे. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका बळावते. तसे पाहता शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचे कोणतेच संकेत मिळत नाहीत; पण शरीरातील काही संवेदनशील हालचालीमुळे 'हाय कोलेस्ट्रॉल'ची माहिती मिळू शकते.

'ग्लोबल हेल्थ एजन्सी'च्या मते, शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास संबंधिताला हृदयविकारासंबंधीच्या आजाराला सामोरे जावे लागते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले, तर त्याची शरीरावर कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत. म्हणूनच त्याला 'सायलेंट किलर' असेही म्हटले जाते.
तसे पाहिल्यास कोलेस्ट्रॉल हा एक रक्‍तातील मेणासारखा घटक असतो. 'बॅड' आणि 'गुड' अशा दोन प्रकारचा कोलेस्ट्रॉल असता.

गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे 'हाय डेन्सिटी लिपोप्रोटिन' आणि बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे 'लो डेन्सिटी लिपोप्रोटिन'. यांचे प्रमाण वाढल्यास अनेक समस्या निर्माण होतात; पण कोलेस्ट्रॉल वाढल्याचे कोणतेच संकेत मिळत नाहीत, तरीही तज्ज्ञांच्या मते, हात आणि पायात प्रचंड वेदना जाणवू लागल्या की, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले, असे समजावे. यावर वेळीच उपचार न केल्यास क्रॅम्पच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. पण, काही वेळा हात दुखण्याचे वेगळे कारणही असू शकते. यासाठीच डॉक्टरांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news