हृदयाच्या आरोग्यासाठी स्ट्रॉबेरी गुणकारी | पुढारी

हृदयाच्या आरोग्यासाठी स्ट्रॉबेरी गुणकारी

नवी दिल्‍ली : लालचुटूक स्ट्रॉबेरी खाणे कुणाला आवडत नाही? थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाला गेलं की तिथे मिळणार्‍या अशा स्ट्रॉबेरीचे सेवन करण्याचा आनंद अनेकजण घेत असतात. अर्थात हल्‍ली सगळीकडेच स्ट्रॉबेरी उपलब्ध होते आणि ती स्वादाबरोबरच आरोग्यासाठीही चांगली असते. विशेषतः हृदयाच्या आरोग्यासाठी स्ट्रॉबेरी गुणकारी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

स्ट्रॉबेरीमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामधील अँटिऑक्सिडंटस् आणि पॉलीफेनॉल्स संयुगं विशेषतः हृदयासाठी गुणकारी ठरतात. या संयुगांमुळे हार्टअ‍ॅटॅकचा धोका कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे रोज किंवा आठवड्यातून किमान तीन वेळा स्ट्रॉबेरीचे सेवन लाभदायक ठरते.

स्ट्रॉबेरीमुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचा स्तर कमी करण्यासही मदत मिळते. सध्या अनेक लोक जंकफूडच्या आहारी जातात आणि त्यामुळे हृदयाच्या समस्या सुरू होतात. असा आहार टाळून जर फळे, भाज्यांचे सेवन केले तर हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. त्यामध्येही स्ट्रॉबेरी हृदयासाठी चांगलीच गुणकारी ठरू शकते.

Back to top button